अवैधरित्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
पिंपरी;बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी तिघांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनी शस्त्र बाळगण्यास मनाई केलेल्या आदेशाचा भंग केल्याबाबत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमित धोत्रे, कृष्णा (दोघे रा. गांधीनगर, पिंपरी) आणि त्यांच्या अल्पवयीन साथीदारावर गुन्हा नोंदवला आहे. याबाबत पोलीस शिपाई रमेश दोरताले यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दि. ११ दुपारी पाच वाजता एच ए कॉलनीच्या गेट समोर तिघेजण घातक शस्त्र घेऊन आले असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. कोयता बाळगल्या प्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन समजपत्र देऊन त्याला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान त्याचे दोन्ही साथीदार दुचाकी (एम एच 14/बी एफ 4066) वरून पळून गेले.
पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!