सिंहगडावर फिरायला गेलेल्या पर्यटकांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई,८८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल
सिंहगड;सिंहगडावर फिरायला गेलेल्या पर्यटकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सिंहगडावर गर्दी करु नये, अशा सूचना पोलिसांकडून वारंवार करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने पुणे पोलिसांनी दंडात्मक कारवाई ला सुर्वात केली आहे.
पुणे पोलिसांनी शनिवारी आणि रविवारी सिंहगडावर आलेल्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई केली. दोन दिवसांत पोलिसांनी १७७ जणांवर ही दंडात्मक कारवाई करत ८८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. पर्यटकांची गर्दी आणि त्यामध्ये झालेले कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन या पार्श्वभूमीवर हवेली पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.खडकवासला धरण, सिंहगड किल्ला परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!