पीएमपीएल चालकाच्या खुनाच रहस्य उघड,४ आरोपी गजाआड, गुन्हे शाखा युनिट ६ ची उल्लेखनीय कामगिरी

कात्रज;लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी गौतम उर्फ अमोल मच्छिंद्र साळुखे (वय २९) या पीएमपीएमएल चालकाचा दगडाने ठेचून निघृण खून करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास लागला असून पोलिसांनी खून करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली.

ऋषिकेश संजय बोरगावे (वय ३१), अक्षय हनुमंत जाधव (वय २१), प्रज्वल सचिन जाधव (वय २०) आणि तुषार सूर्यकांत जगताप (वय २१) या चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर अन्य एक आरोपी फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मृत गौतम उर्फ अमोल मच्छिंद्र साळुखे हे पीएमपीएल चालक होते. शनिवारी रात्री ड्युटी संपल्यानंतर ते बेपत्ता झाले होते. दरम्यान रविवारी सकाळी लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीत त्यांचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. गुन्हे शाखा ६ चे पोलीस देखील या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. तपासादरम्यान पोलीस नाईक नितीन मुंडे आणि नितीन शिंदे यांनी हडपसर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी त्यांना हा गुन्हा ऋषिकेश बोरगावे आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली होती. खून केल्यानंतर ते उमरगा जिल्हा उस्मानाबाद येथे पळून गेले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उमरगा येथे जाऊन एका लॉजमधून वरील आरोपींना अटक केले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी खून केल्याची कबुली दिली.

मयत गौतम उर्फ अमोल मच्छिंद्र साळुखे आणि आरोपी दोन ते तीन ठिकाणी एकत्र दारू पिले होते. यातील आरोपी ऋषिकेश बोरगावे आणि गौतम याचे यापूर्वी वाद झाले होते.दारूच्या नशेत त्याने याच कारणावरून पुन्हा एकदा भांडण झाले. आणि सर्व आरोपींनी संगनमत करून डोक्यात दगड घालून गौतम त्याचा खून केला आणि पसार झाले होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोणताही पुरावा मागे नसताना २४ तासाच्या आत आरोपींना अटक केली
आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता, मा.पोलीस सह-आयुक्त पुणे शहर डॉ. रविंद्र शिसवे, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर, श्री अशोक मोराळे, मा पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा, पुणे शहर, श्री श्रीनिवास घाडगे, मा.सहा पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पुणे शहर, श्री लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक श्री गणेश माने, सपोनि नरेंद्र पाटील, पोलीस अमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंडे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लालिगुडे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शैखर काटे, नितीन घाडगे, सुहास तांबेकर, तांत्रिक विश्लेषण विभागाचे सलीम तांबोळी व संदेश निकाळजे यांचे पथकाने केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.