फरार घोषित सराईत दरोडेखोर गजाआड,आरोपीविरुद्ध १६ गुन्हे दाखल

मुंबई;फरार घोषित असलेला मागील काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत चोरट्याला जेरबंद करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे.

ओम उर्फ पप्पू बाळकृष्ण सातपुते (वय ३४) असे या अटक केलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हा सराईत चोरटा वेषांतर करण्यात पटाईत होता, तसेच चोरीचे फोन वापरुन वारंवार सिम बदलत होता. पोलीस ठाण्यात वेगवेगळा पत्ता नोंदवल्याने आरोपीला पकडणे पोलिसांसाठी अवघड जात होते. पोलिसांनी तांत्रिक मदतीच्या सहाय्याने वेगवेगळ्या पत्त्यावर चौकशी करून अखेर त्याला पुन्हा बेड्या ठोकल्या. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला २६ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपी ओम सातपुते याच्यावर एकूण १६ गुन्हे दाखल आहेत. न्यायालयात हजर राहत नसल्याने मुलुंड न्यायलयाने त्याला ११ सप्टेंबर २०१८ रोजी फरार घोषित केले होते.

सदरची उल्लेखनीय कामगिरी नवघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश लामखडे, पोलीस हवालदार राजेंद्र खैरनार, शिपाई दाभाडे व शिंद यांनी केली आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.