डॉक्टर तरुणीच्या बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावणारा डॉ. सुजित जगताप जेरबंद,भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी

पुणे;पुण्यातील प्रसिद्ध भारती हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीच्या बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. याप्रकरणी पुणे पोलिसांनी शहरातील नामांकित डॉक्टरला अटक केले आहे. या डॉक्टरने अॅमेझॉन वरून हे छुपे कॅमेरे मागवून या तरूणीच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये लावले होते.

डॉक्टर सुजित बाजीराव जगताप (वय ४२) असे अटक झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. डॉक्टर एमडी असून टिळक रस्त्यावर त्यांचा दवाखाना आहे. भारती हॉस्पिटलमध्ये ते प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जात होते. त्यांनी स्वतः तरुणीच्या फ्लॅटची बनावट चावी तयार करून घरात प्रवेश करत हे कॅमेरे लावले असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ३१ वर्षाची आहे. भारतीय हॉस्पिटलमध्ये ती प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून काम करते. भारती हॉस्पिटल परिसरातच असणाऱ्या क्वार्टरमध्ये अन्य एका सहकारी डॉक्टर तरुणीसोबत ती राहते. ६ जुलै रोजी तिच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे असल्याचे तिच्या लक्षात आले होते. तिने या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तपासादरम्यान पोलिसांनी भारती विद्यापीठ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एके ठिकाणी डॉक्टर सुजित जगताप कैद झाले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने हे स्पाय कॅमेरे बसवले असल्याची कबुली आरोपी डॉक्टर ने दिली. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता आरोपी डॉक्टर ला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.