किरकोळ वादातून दोघांवर खूनी हल्ले, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

भोसरी;एमआयडीसी भोसरी मधील फुलेनगर येथे चार जणांनी किरकोळ कारणावरून दोघांवर खुनी हल्ले केले. याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. ही घटना रविवारी दि. ११ रात्री आठ वाजताच्या सुमारास भोसरी मधील फुलेनगर परिसरात घडली.

पहिल्या प्रकरणात आता प्रवीण बबन लांडगे (वय २३, रा. फुलेनगर, एमआयडीसी) भोसरी यांनी फिर्याद दिली आहे.डीश्या उर्फ सुरज गायकवाड, जावेद नदाफ (दोघे रा. फुलेनगर, एमआयडीसी भोसरी), अजय ससाणे, अण्ण्या हजारे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास आरोपी सुरज गायकवाड याने फिर्यादी यांना ‘तू आमच्याकडे का बघतो. तुला लय माज आला का. तुला खल्लास करून टाकतो’, असा दम भरत, सुरज गायकवाड आणि जावेद नदाफ या दोघांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात कोयत्याने वार केले. तर अन्य दोन आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

दुसऱ्या प्रकरणात अस्लम हनीफ चाकोरे (वय ३२, रा.फुलेनगर, एमआयडीसी भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपींनी फिर्यादी यांचा मेहुणा आमीर याला मारहाण केली. त्याचा फिर्यादी यांनी आरोपींना जाब विचारला. त्यावरून आरोपी सुरज गायकवाड आणि जावेद नदाफ यांनी फिर्यादी यांना ठार मारण्याच्या उद्देशाने शस्त्राने डोक्यावर, हातावर वार करून गंभीर जखमी केले. अन्य आरोपींनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

पुढील दोन्ही गुन्ह्यांचा तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.