लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शरीरसंबंध ठेऊन तरुणीची फसवणुक,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे;एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शरीरसंबंध ठेवल्यानंतर लग्न मात्र दुसऱ्याच तरुणीसोबत केले. यानंतर फसवणूक केल्याप्रकरणी एका २२ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारी वरून संबंधित तरुणाविरोधात बलात्काराचा दाखल करण्यात आला आहे.

मनीष मधुकर आदमाने (वय २२) त्याच्याविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,डिसेंबर २०१९ मध्ये पीडित तरुणी आणि आरोपीची ओळख झाली होती. ओळख झाल्यानंतर आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून आणि तिचा विश्वास संपादन करून मित्राच्या रूमवर घेऊन जात तिच्या इच्छेविरुद्ध संमतीविना शरीरसंबंध ठेवले. काही दिवसानंतर त्याने पीडित तरुणी सोबत लग्न करता दुसऱ्याच मुली सोबत लग्न करून पीडित तरुणीचा विश्वासघात करून त्याची फसवणूक केली. तक्रार आल्यानंतर सिंहगड रस्ता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.