पूर्ववैमनस्यातून डोक्यात दगड घालून एकाचा खून,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
खेड;पूर्वीच्या भांडणातून वार करत डोक्यात दगड घालून एका इसमाचा खून केल्याची घटना होलेवाडी (ता. खेड) येथे उघडकीस आली. ११ ते १२ जुलै दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी सहा जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतुल कल्याण वाडेकर (वय ३१, रा. बहुळ, ता.खेड ) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मिलिंद विठ्ठल जगदाळे, बंटी विठ्ठल जगदाळे, मयुर विठ्ठल जगदाळे, सचिन शांताराम पाटणे, तौसिफ शेख, प्रविण मारुती थिगळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचा भाऊ राहुल याच्या पूर्वीच्या भांडणातून वार करत डोक्यात दगड घालून खून केला. दाखल फिर्यादीवरून सहा जणांविरोधात भारतीय दंड विधान कलम 302, 143, 147, 149 अंतर्गत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!