भाजपच्या नगरसेविका अर्चना बारणे यांचे निधन
पिंपरी चिंचवड;पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका अर्चना तानाजी बारणे यांचे आज (मंगळवारी) निधन झाले. त्यांना डेंग्यूची लागण झाली होती. एका खासगी हॉस्पिटलमध्ये आज, मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांनी अखेरचा शास घेतला.
अर्चना बारणे या प्रभाग क्रमांक २३, शिवतीर्थनगर, समर्थनगर, केशवनगरमधून भाजपच्या चिन्हावर पहिल्यांदाच निवडून आल्या होत्या. त्यांनी स्थायी समितीचे सदस्यत्व आणि ‘ग’ प्रभाग कार्यालयाचे अध्यक्षपदही मिळवले होते. त्यांना डेंग्यूची लागण झाली असता, त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी आज शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
थेरगाव येथील स्मशानभूमीत रात्री त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!