निगेटीव्ह रुग्णाला ठेवले कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांसोबत ; पिंपरी चिंचवड वैद्यकीय विभागाचा भोंगळ कारभार

पिंपरी चिंचवड :  पिंपरी-चिंचवड महापालिकेतील वैद्यकीय विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.पिंपरी गावातील एका तरुणाचा निगेटिव्ह असलेला रिपोर्ट कोविड अॅंटीजन तपासणीमध्ये रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे सांगत त्याला कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले.

याबद्दल अधिक माहिती अशी की, पिंपरी गावातील शुभम अविनाश वाघेरे यास दिनांक 7 जुलै रोजी सर्दी व ताप आल्याने दक्षता म्हणून त्यांची 8 जुलै रोजी अॅंटीजन तपासणी जिजामाता रुग्णालय पिंपरी येथे करण्यात आली. तपासणीमध्ये शुभम यांना पॉझिटिव्ह घोषित करण्यात आले.  त्यानुसार शुभम वाघेरे उपचारासाठी दाखल होण्याकरिता वायसीएम रुग्णालयात गेला. तेथून भोसरीतील बालनगरी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होण्याचे सांगितले. त्यानुसार शुभम बालनगरीमध्ये कोविड सेंटरमध्ये दाखल झाला.

कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये राहून तीन दिवस उपचार घेतल्यानंतर 11 जुलै रोजी त्या शुभमच्या रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचा एसएमएस राज्य सरकारच्या संकेतस्थळावर आला. त्यामुळे नातेवाईकांच्या पायाखालची वाळू सरकली. नेमका काय प्रकार आहे, याची त्यांनी खातरजमा केली असता राज्य सरकारच्या संकेतस्थळावर त्यांना निगेटीव्ह रिपोर्ट दिसला. निगेटीव्ह असतानाही रुग्णाला पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये ठेवले. त्यातून त्याला कोरोनाची लागण झाली तर जबाबदारी कोणाची ?, असा सवाल करत संबंधितांवर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

याबाबत बोलताना राजेंद्र वाघेरे म्हणाले, माझा पुतण्या शुभम अविनाश वाघेरे यास दिनांक 7 जुलै रोजी सर्दी व ताप आल्याने दक्षता म्हणून त्यांची 8 जुलै रोजी अॅंटीजन तपासणी जिजामाता रुग्णालय पिंपरी येथे करण्यात आली. तपासणीमध्ये शुभम यांना पॉझिटिव्ह घोषित करण्यात आले. परंतु राज्य सरकारच्या संकेत स्थळावरून शुभम यांचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे 11 जुलै रोजी मेसेजद्वारे सांगण्यात आला त्यामुळे सदर प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर आमच्या कुटुंबियांची मोठ्या प्रमाणावर तारांबळ उडाली. त्यामुळे निगेटिव्ह रूग्णाला बालनगरी भोसरी येथील कोविड केअर सेंटरमध्ये पॉझिटिव्ह रुग्णासमवेत ठेवण्यात आले त्यातून त्याला कोरोंनाची लागण अथवा काही त्रास झाल्यास याची जबाबदारी कोणाची असेल याचा खुलासा वाघेरे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात मागितला आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील सुरू असलेला भोंगळ कारभार त्वरित थांबवून दोषी अधिकारी व कर्मचारी यांचेवर कारवाई करण्याची मागणी देखील वाघेरे यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.