मानसिक त्रासतून पतीची आत्महत्या,पत्नी, सासूसह ७ जणांवर गुन्हा दाखल

चाऱ्होली;पत्नी, सासू तसेच राहत्या इमारतीच्या बिल्डरच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केली याबाबत ७ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना होली खुर्द येथे घडली.

फिर्यादी यांचा भाऊ योगेश विलास शिंदे (वय ३६) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सुखदेव विलास शिंदे (वय ३५, रा.धनकवडी, पुणे) यांनी सोमवारी (दि. १२) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पत्नी स्नेहल योगेश शिंदे, सासु विजया चंद्रकांत माने, चेतन चंद्रकांत माने, सुमन किरण माने, किरण महादेव माने, अभिजीत किरण माने, बिल्डर मेहता अशी गुन्हा दाखल झालेल्या आरीपिंची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ योगेश शिंदे याला घरगुती भांडणावरून पत्नीने त्रास दिला. तसेच ते राहत असलेल्या सोसायटीचे चेअरमन असताना त्याच्या कडून सोसायटीमधील फ्लॅट धारकांकडून बिल्डिंगच्या खाली पार्किंगची सोय करून देण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपये घेतले. पैसे घेऊन कुठलीही पार्किंगची सुविधा उपलब्ध केली नाही. याचा मानसिक त्रास झाल्याने योगेश शिंदे यांनी आत्महत्या केली. योगेश यांना आत्महत्या करण्यास आरोपींनी प्रवृत्त केले असल्याचे फिर्यादी यांनी म्हटले आहे.

पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.