अवैधरित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक, एक गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतुस,२५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
तळेगाव;पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले.
कार्तिक संभाजी कारके (वय २१, रा.शंकरवाडी- ऊर्से, ता. मावळ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार सतीश मिसाळ यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील चौराईनगर येथे असलेल्या खिंडीत एक तरुण पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी कार्तिक याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी त्याच्याकडील २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.
पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!