धक्कादायक!डोक्यावर आणि डोळ्याखाली तीक्ष्ण हत्याराने वार करून प्रवाशाचा खून,पुणे स्टेशन येथील प्रकार

पुणे स्टेशन;पुणे स्टेशन परिसरातील एका बस स्टॉप वर झोपलेल्या प्रवाशाचा चोरीच्या उद्देशाने खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. हा खून कोणी केला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

बंडगार्डन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष कांजळे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. संजय बाबू कदम (वय ३५, रा.घाटकोपर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत संजय कदम हे मूळचे घाटकोपर येथील परेरावाडी येथील आहेत. सोमवारी रात्री उशीरा ते घाटकोपर येथे जाण्यासाठी पुणे स्टेशन परिसरात झाले होते. दरम्यान रात्र झाल्यामुळे साधू वासवानी चौकातील असे का बस स्टॉप वर रात्री ते झोपले होते. त्यावेळी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात आरोपीने चोरी करण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यावर आणि डोळ्याखाली तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांचा खून केला.

मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासा नंतर चोरीच्या उद्देशाने हा खून करण्यात आला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.

पुढील तपास बंडगार्डन पोलीस करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.