चाकण:कंपनीचे कपाट आणि डायरेक्टर केबिनचे दरवाजे तोडून ३ लाख ४० हजारांना घातला गंडा,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

चाकण;कुरूळी येथील कॅटॅलिक रॉबॅटिक्स अॅड ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत अज्ञात चोरट्यांनी ३ लाख ४० हजारांची चोरी केली. ही घटना मंगळवारी दि. १३ सकाळी उघडकीस आली.

वासाप्पा यल्लाप्पा माळोदे (वय ७३, रा. हडपसर) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कुरूळी येथील कॅटॅलिक रॉबॅटिक्स अॅड ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करतात. सोमवारी रात्री आठ ते मंगळवारी सकाळी सात वाजताच्या कालावधी अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या मागील बाजूचे पत्रे उचकटून कंपनीत प्रवेश केला. कंपनीचे कपाट आणि डायरेक्टर केबिनचे दरवाजे तोडून, सीसीटीव्ही कॅमेरे तोडून त्यांचे नुकसान केले. तसेच कंपनीमधून चार लॅपटॉप, कॉपर फिटिंग, ब्रॉस फिटिंग, कॉपर ट्यूप असा एकूण तीन लाख ४० हजार ९३१ रुपयांचा ऐवज चोरून नेला.

पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.