महाराष्ट्र टप्प्याटप्प्याने ‘अनलॉक’ करण्याची तयारी सुरू

मुंबई;लवकरच होण्याची शक्यता आहे. बाबत टास्क फोर्सने अहवाल सादर केला आहे. महाराष्ट्र राज्यातील निर्बंधांबाबत सतत सुरू असलेल्या धरसोडीमुळे व्यापारी तसेच नोकरवर्गात असंतोष आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून महाराष्ट्र टप्प्याटप्प्याने ‘अनलॉक’ करण्याची तयारी सुरू आहे. मात्र, मुंबईत लोकल प्रवास तूर्त सर्वांसाठी खुला होणार नाही.

राज्यातील व्यापारी सततच्या लॉकडाऊनवर नाराज आहेतच. त्यासोबत मंत्री आणि सहकारी पक्षांनीही नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र अनलॉक कशाप्रकारे करता येईल, याचा अभ्यास करून अहवाल देण्याचे आदेश टास्क फोर्सला दिले आहेत.

टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना दिलेला अहवाल

उद्योग, व्यापार यावर असलेले निर्बंध हटवून कशा सवलती देता येतील यासंदर्भातील सूचना टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना केल्या आहेत. या अहवालावर याच आठवड्यात टास्क फोर्सच्या सदस्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री टप्प्याटप्प्याने निर्बंध हटविण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

  • हॉटेल, रेस्टॉरंट रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्याची शिफारस
  • ‘अनलॉक’च्या पहिल्या टप्प्यात राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंटस् रात्री दहापर्यंत सुरू ठेवावेत, असे टास्क फोर्सने सुचवले आहे.
  • सरकारी तसेच खासगी कार्यालयांतील उपस्थितीची मर्यादा ५० टक्क्यांवरून ७५ टक्के करण्याची शिफारस केली आहे.
  • हॉटेल आणि रेस्टॉरंटस्मधील सर्व कर्मचार्‍यांच्या लसीकरणाची जबाबदारी मालकांवर सोपविण्यात येईल.
  • लसीकरण झालेल्या ग्राहकांनाच रेस्टॉरंटस्मध्ये प्राधान्याने प्रवेश द्यावा, असे टास्क फोर्सने म्हटले आहे.
  • व्यापार्‍यांची नाराजी लक्षात घेऊन दुकाने सुरू ठेवण्याची वेळ वाढवून दिली जावी.
  • मात्र, त्यासाठी दुकानांमधील सर्व कर्मचार्‍यांचे लसीकरण होणे बंधनकारक करावे, असे टास्क फोर्सने अहवालात म्हटले आहे.
  • पूर्ण लसीकरण झालेल्या कर्मचार्‍यांना दुकाने, कार्यालयांत येण्यास प्राधान्य दिले जावे, असे टास्क फोर्सने म्हटले आहे.
  • कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले तरी मुंबई लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी सुरू होण्याची शक्यता आत्ता तरी नाही.
0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.