सरकारी वकीलाला लाच घेताना रंगेहाथ पकडले,लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कामगिरी

पुणे;जामीन मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन देऊन साडेतीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना खेड येथील विशेष न्यायालयाच्या अतिरिक्त सरकारी वकिलाला रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खेड येथे ही कारवाई केली आहे.

देवेंद्र मधुकर सोन्नीस (वय ५७) असे पकडलेल्या वकिलांचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या अशिलाचा खेड येथील न्यायालयात जामिनासाठी अर्ज आहे. या जामिनावर सुनावणी असताना त्यावर हरकत घेऊ नये यासाठी व जामीन मिळवण्यासाठी मदत करण्यासाठी सरकारी वकील देवेंद्र यांनी लाचेची मागणी केली होती. दरम्यान तक्रारदारांनी याची माहिती लाचलुचपत विभागाला दिली होती. त्यानंतर या माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी देवेंद्र यांना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला आणि मोठ्या शिताफीने त्यांनी आज साडेतीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना देवेंद्र सोनिस यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.