इंद्रायणीत पोहताना १८ वर्षीय तरुण बुडाला,तरुणाचा शोध सुरू

देहू;मित्रांसोबत पोहायला गेलेला १८ वर्षीय तरुण देहुगावजवळ इंद्रायणी नदीत बुडाला. आज बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दरम्यान, घटनास्थळी देहूरोड पोलीस आणि एनडीआर एफ चे जवान दाखल झाले असून तरुणाचा शोध सुरू आहे.

आदेश सुरेश हागवणे (वय १८, रा. विठ्ठलवाडी, देहुगाव) असे नदीत बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आदेश आणि त्याचे तीन मित्र देहुगावजवळ बोडकेवाडी येथे इंद्रायणी नदीत पोहायला गेले होते. पोहताना आदेश नदीत बुडाला असून तो बेपत्ता आहे. दरम्यान, त्याचे इतर मित्र सुखरूप बाहेर आले आहेत. घटनास्थळी देहूरोड पोलीस आणि एनडीआर एफ चे जवान दाखल झाले असून तरुणाचा शोध सुरू आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.