७५ वर्षीय वृद्धाला तलवार जवळ बाळगण पडलं महागात, आरोपी अटक

पिंपरी चिंचवड;बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी ७५ वर्षीय वृद्धाला पिंपरी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई इंदिरानगर, चिंचवड येथे करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस हवालदार शांताराम हांडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुभाष मुरलीधर करडे (वय ७५, रा.इंदिरानगर, चिंचवड) असे अटक झालेल्या आरोपी वृद्धाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरात कोणत्याही प्रकारची शस्त्रे बाळगण्यास मनाई आहे. असे असताना आरोपी सुभाष करडे हा तलवार हत्यार जवळ बाळगून मंगळवारी भर दिवसा दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास सार्वजनिक रस्त्याने फिरत होता. या बाबत माहिती मिळाल्यानंतर पिंपरी पोलिसांनी कारवाई करत सुभाष करडे याला अटक केली.

पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.