जुगार अड्यावर चाकण पोलिसांचा छापा,७२ हजारांचा मुद्देमाल जप्त
चाकण;नाणेकरवाडी येथे सुरू असलेल्या एका जुगार अड्डयावर चाकण पोलिसांनी छापा मारला. त्यात पोलिसांनी ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी दि. १४ करण्यात आली.
याबाबत पोलीस नाईक मनोज साबळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रामेश्वर बोभीषण घोळवे (वय २७, भोसरी), व्यंकट चंद्रकांत भिसे (वय २८, रा. नाणेकरवाडी, ता.खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाणेकरवाडी येथील तळेगाव चौक परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी व्हिडीओ गेमवर पैसे लावून जुगार खेळत आणि खेळवत होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता बुधवारी दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास या जुगार अड्डयावर कारवाई केली. कारवाईमध्ये ७२ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!