फेसबुकची ओळख पडली महागात,महिलेचे न्यूड फोटो मिळउन व्हायरल करण्याची धमकी देत केली एक कोटी ची मागणी

पुणे;वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेसबुकवर ओळख झाल्यानंतर एका महिलेला प्रेमाच्या ओळखीतुन त्या महिलेचे न्यूड फोटो मिळवून ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एक कोटीची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

एका ३४ वर्षीय महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. २०१९ पासून हा प्रकार सुरू होता.वानवडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी सौरभ सुभाषचंद्र सुखिजा (वय ३१) त्याच्याविरोधात बलात्कार आणि खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी ची ओळख फेसबुकवर झाली होती. त्यानंतर आरोपीने तिचा विश्वास संपादन करून प्रेमाचे नाटक करत तिचे न्यूड फोटो आणि व्हिडिओ मिळवले होते. हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्यांनी महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले होते. तसेच हे व्हिडिओ त्याने स्वतःच्या स्टेटसला देखील ठेवले होते. दरम्यान हे फोटो आणि व्हिडिओ परत देण्यासाठी त्याने फिर्यादी महिलेकडे तब्बल एक कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर पीडित महिलेने सायबर पोलिस ठाण्यात या प्रकरणी अर्ज दिला होता.

पुढील तपास वानवडी पोलिस करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.