वेश्याव्यवसाय करणारा सराईत गजाआड,हिंजवडी पोलीसांची कामगीरी

हिंजेवडी;महिलांकडून वेश्याव्यवसाय करूनघेणाऱ्या दलालाला पोलिसांनी अटक केली. ही घटना बुधवारी दि. १४ हिंजवडी येथे उघडकीस आली.

महिला पोलीस उपनिरीक्षक बोरकर यांनी बुधवारी दि. १४ हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनील बळीराम सरवदे (रा.जय मल्हार नगर, थेरगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याचा साथीदार सनी (पुर्ण नाव, पत्ता नमुद नाही) याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील सरवदे आणि सनी हे दोघेजण महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करीत होते. तसेच त्यांना मिळालेली रक्कम आपसात वाटून त्यावर आपली उपजीविका भागवत असताना मिळून आले. पोलिसांनी कारवाई करत दोघांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 370 (3), 34, पिटा ॲक्ट कलम 3,4,5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.