चाकण: सरराईत चोरट्यांनी कंपनीत मारला २ लाखाला गंडा,चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

चाकण;कंपनीच्या स्टोअर रुमचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख ३३ हजार रुपये किमतीचा ब्रांझ धातूचा माल चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. १२) मध्यरात्री कुरूळी येथील बंडी इंडिया लिमिटेड या कंपनीत घडली.

संग्राम कोंडीराम सोनवणे (वय ३३, रा. निगडी) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनवणे कुरूळी येथील बंडी इंडिया लिमिटेड या कंपनीत नोकरी करतात.सोमवारी मध्यरात्री दीड ते साडेतीन वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या स्टोअर तुमचे दरवाजाचे कुलूप तोडून आत येऊन. स्टोअर रूम मधील लोखंडी जाळीच्या पिंजऱ्याचे कुलूप तोडून ब्राँझ धातूचे २ लाख ३३ हजार ८६८ रुपये किमतीचे पार्ट चोरून नेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.