अवैधरित्या गुटखा विक्री करणारी टोळी गजाआड, सामाजिक सुरक्षा पथकाची कामगिरी

पिंपरी चिंचवड;बेकायदेशीरपणे गुटखा विक्री केल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकाने चिंचवड आणि भोसरी परिसरात दोन ठिकाणी छापे मारले. यामध्ये पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १५) करण्यात आली.

दळवीनगर झोपडपट्टी येथील मोगा प्रोव्हिजन स्टोअर्स या दुकानात कारवाई करण्यात आली. त्यामध्ये पोलिसांनी अचलाराम डुंगाराम चौधरी (वय ४२, रा. दळवी नगर झोपडपट्टी, चिंचवड), जवानजी देवासी या दोघांना अटक केली.

याबाबत महिला पोलीस शिपाई सोनाली माने यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपींनी शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थ आणि गुटखा विक्री करण्यासाठी दुकानात ठेवले होते. याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामाजिक सुरक्षा पथकाची दुसरी कारवाई

भोसरी; आळंदी रोडवर असलेल्या ओम साई पान स्टॉल या टपरीवर केली.

कोमल एकनाथ पाटील, हे अटक झालेल्या महिला आरोपीचे नाव आहे. गोपाळ एकनाथ पाटील, सुरज संजय पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी कोमल पाटील हिची भोसरी आळंदी रोडवर पानटपरी आहे. त्यामध्ये तिने शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री करण्यासाठी ठेवला होता. तर हा गुटखा आरोपी गोपाल पाटील आणि सुरज पाटील यांनी पुरवला होता.

पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.