पूर्ववैमनस्यातून मालकाच्या मुलीला पळवले,वीटभट्टी कामगारांचा मालकाच्या हातून मृत्यु

चाकण;वीटभट्टी आणि हॉटेल व्यवसाय असणाऱ्या एका व्यवसायिकाच्या विटभट्टीवर काम करणाऱ्या एका कामगाराने मालकाच्या मुलीला पळवून नेले. त्यास दुसऱ्या कामगाराने साथ दिली. त्यानंतर मालकाने मुलगी आणि तिला पळवून नेणाऱ्या दोघांना शोधून हॉटेलमध्ये बेदम मारहाण केली. यात दोन्ही कामगारांचा मृत्यू झाल्याचा प्रकार खेड तालुक्यातील करंजविहिरे येथे समोर आला आहे.

वीटभट्टी मालक आणि त्याच्या पाच साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.बाळू सिताराम गावडे (वय २६), राहुल दत्तात्रय गावडे (वय २८, दोघे रा. आसखेड खुर्द, ता.खेड, जि. पुणे) अशी मृतावस्थेत आढळलेल्या दोन कामगारांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार,खेड तालुक्यात करंजविहिरे परिसरात वीटभट्टी मालकाचे हॉटेल आहे. हॉटेलसमोर त्याची वीटभट्टी आहे. मयत बाळू गावडे आणि राहुल गावडे त्या वीटभट्टीवर काम करत होते. बाळू गावडे याने मालकाच्या २१ वर्षीय मुलीला पळवून नेले. त्यासाठी राहुल गावडे याने मदत केली.वीटभट्टी मालक आणि साथीदारांनी बाळू, राहुल आणि मुलगी या तिघांना शोधले. त्यांना हॉटेलमध्ये आणून लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. या गून्ह्या अंतर्गत पोलिसांनी मुलीचे वडील आणि अन्य पाच जणांना जेरबंद केले आहे.

पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.