आशिष कुमार चौधरी यांच्यावर आमदार पुत्र प्रणव गायकवाड यांनी केलेला फसवणुकीचा गुन्हा भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना भोवणार का?

उल्हासनगर(गौतम वाघ) : आमदार पुञाला ३९ लाखांचा गंडा घातला म्हणून सॉफ्टवेअर डेव्हलपर आशिषकुमार चौधरी या तरुणावर कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांचे पुत्र प्रणव गायकवाड यांच्या तक्रारी वरुन दि.१४/०७/२०२१ रोजी गुन्हा रजि.नं- ३८१/२०२१ भा.द.वि कलम ४२०,४०६,४६५,४७१ प्रमाणे कोळसेवाडी पो.स्टे. कल्याण येथे गुन्हा दाखल झाला असुन आशिषकुमार चौधरी यास अद्याप पर्यंत अटक करण्यात आलेली नाही.

प्रणव गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार प्रणव गायकवाड यांच्या मायक्रोनेट इंटरप्राइजेस फर्म मध्ये आशिषकुमार चौधरी नोकरी करत असतांना शैक्षणिक विकासाकरीता इ.आर.पी. सॉफ्टवेअर डेव्हलप करून अधिक फायदा करून घेण्याच्या हेतूने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून आँक्टोबर २०१८ आँक्टोंबर २०२० या काळात प्रणव यांच्या खात्यावरुन एकूण ३९,२०,०००/ आर.टी.जी.एस द्वारा आशिष चौधरीच्या खात्यावर वर्ग करून फर्मची फसवणूक केली. असे फिर्यादीत नमूद आहे

आशिष कुमार चौधरी याचेवर कोळसेवाडी पोलीस स्टेशनला प्रणव गायकवाड यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल झाला आहे. तो कदाचित षडयंञाचा भाग तर नसावा अशीहि शंका निर्माण होत आहे. आशिष कुमार चौधरीने पोलीस आयुक्त ठाणे यांचे कडे १९ मे २०२१ रोजी कल्याण पूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांचे विरुद्ध गंभीर आरोप असलेला तक्रार अर्ज दाखल केला होता.

दि.१९-०५-२०२१ रोजी आशिषकुमार चौधरीने भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या विरुद्ध केलेल्या तक्रार अर्जात कल्याणचे डि.सी.पी.विवेक पानसरे यांच्याही नावाचा उल्लेख आहे. या अर्जा प्रमाणे आशिष कुमार यास लोकांना आशिष यांचे घरी पाठवून,मोबाईल वरुन किंवा पोलीस स्टेशनला बोलवुन सतत दमदाटी करत असत त्यामुळे त्याचे कौटुंबिक जिवन उद्वस्त होत असुन सतत त्याच्या मनात आत्म हत्येचे विचार घोळत राहतात अशा वेळेस जर आशिष कुमारने आत्महत्या केली तर कल्याण विभागाचे डि.सी.पी विवेक पानसरे आणि कल्याणचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना जबाबदार धरण्यात यावे असेही आशिषकुमारच्या तक्रार अर्जात नमुद आहे.
१९ मे २०२१ रोजी आशिष कुमार चौधरी यांने केलेल्या तक्रारी अर्जात E.R.P साँफ्टवेअरचा देखिल उल्लेख करतांना आशिषकुमार चौधरी हा आमदार गणपत गायकवाड यांचे पुञ प्रणव गायकवाड यांच्या मायक्रोनेट इंटरप्रायझेस या फर्ममध्येच दरमहा एक लाख रुपये वेतनावर नोकरीस होता असे नमूद केलेले आहे.सुमारे ८ महिन्याच्या कालावधीत सदरचे साँफ्टवेअर मार्केटींगसाठी तयार झाले होते. या साँफ्टवेअरसाठी सुमारे ३५,००,०००/-(पस्तीस लाख) रुपये खर्च आला असून त्यासाठीची इन्व्हेस्टमेंट ही भाजपा आमदारांनी केला असून E.R.P. एज्युकेशन सॉफ्टवेअर पूर्णपर तयार झाले असुन हे सॉफ्टवेअर प्रणव गायकवाड यांच्या मायक्रोनेट कंपनीच्या ताब्यात असल्याचेही नमुद आहे.

सदर तक्रार अर्जात आमदारांची खाजगीतील माणसे दिपक सपके, सचिन इंगळे आणि योगेश पाटील या माणसां कडुन आशिषकुमार यास दमदाटी करून त्याच्या जवळ असलेली स्विफ्ट,फॉर्च्यूनर आणि BMw. ही चारचाकी वाहने आणि 320 सी.सी.ची थंडरबर्ड मोटार सायकल घेऊन गेलेले आहेत आणि अद्यापर्यंत परत केलेली नाहीत या वाहनांची किंमत सुमारे ३० लाखापर्यंत झाले शिवाय वरिल तिघां व्यक्ती मार्फत आशिषकुमार यास धमक्या देऊन आतापर्यंत सुमारे साडेचार लाखांची रक्कम आशिषकुमार याचे कडुन उकळण्यात आली आहे. तक्रारी अर्जानुसार भाजपा आमदार गणपत गायकवाड कल्याणचे डि.सी.पी. विवेक पानसरे यांनी वरिल तिघां इसमांमार्फत ३४ ते ३५ लाख रुपये उकळले असल्याचाही उल्लेख तक्रार अर्जात आहे. दिपक सपके, सचिन इंगळे, योगेश पाटील हे तिघेही गुंडप्रवृतीचे असून विविध पो.स्टे.ला त्यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल असून ते तिघेही हिस्ट्री शिटर असल्याचा उल्लेखही आशिषकुमार चौधरी यांच्या तक्रार अर्जात उल्लेख आहे. आशिष चौधरी याच्या तक्रार अर्जात बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव येथील तत्कालीन कुलगुरु प्रदिप पाटील यांच्या ही नावाचा उल्लेख असुन प्रदिप पाटील ह्यांनी ERP या साँफ्टवेअर करता मान्यता दिली होती. त्यानंतर तत्कालीन कुलगुरु यांनी तडफातडफी राजीनामा देऊन उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातून बाहेर पडले. त्यांनी विद्यापिठाचा कोटयावधी रुपयांचा अपहार करून ते फरार झाल्याबाबतचा गुन्हा दाखल असल्याचाही उल्लेख तक्रार अर्जात आहे.
या तक्रार अर्जात असेही नमुद आहे की,उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे तत्कालीन कुलगुरु यांचेवर विद्यापिठाचा कोट्यावधी रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी जळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर जानेवारी २०२१ पासून भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याणचे डि.सी.पी विवेक पानसरे यांना हाताशी धरून आशिषकुमार चौधरी यांचेवर फसवणुकीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली होती असा स्पष्टपणे उल्लेख पोलीस आयुक्त ठाणे यांचेकडे केलेल्या तक्रार अर्जात आहे.

दि. १९-०५-२०१५ रोजी आशिष कुमार चौधरी याने कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड, कल्याणचे डि.सी.पी विवेक पानसरे आणि आमदारांचे खाजगीतील दिपक सपके, सचिन इंगळे, योगेश पाटील या तिघा हिस्टी शिटर व्यक्तिचा उल्लेख आहे. या सर्वांनी मिळुन आशिष चौधरी कडुन जबरदस्तीने धमकी देऊन त्याच्या चार वाहनासहीत सुमारे साडेचार लाखाची रोख रक्कम उकळली आहे आणि वरिल लोक हे त्यास आत्महत्येस प्रवृत्त करित असुन त्यांने आत्महत्या केल्यास आमदार गणपत गायकवाड व संबंधितांना जबाबदार धरण्यात यावे तसेच त्याचेवर फसवणुकीचा खोटा गुन्हा दाखल करण्याचीही त्यास धमकी दिली गेली असल्याचा स्पष्टपणे उल्लेख आहे म्हणूनच….
आशिष कुमार चौधरी याचेवर दाखल झालेल्या फसवणूकीच्या गुन्हात अनेक प्रकारच्या शंका उपस्थित होतात..

१) आशिष कुमार चौधरीने दि.१९.०५.२०२१ रोजी तक्रार अर्ज दिल्या नंतर त्या अर्जाची चौकशी लागताच आमदार पुञ प्रणव गायकवाड यांनी तब्बल दोन महिन्या नंतर दि.१४.०७.२०२१ रोजी दाखल केलेल्या गुन्हा संशयातित वाटत असुन आशिष कुमार चौधरीने खरोखरच आमदार पुञास ३९ लाखाचा गंडा घातला असेल तर यापुर्वीच हा गुन्हा दाखल कां झाला नाही?.

२) आशिष कुमार चौधरीच्या दि.१९.०५.२०२१ च्या तक्रार अर्जात भाजपा आमदार गणपत गायकवाड, कल्याणचे डि.सी.पी विवेक पानसरे आणि आमदाराचे खाजगीतील दिपक सपके,सचिन इंगळे,योगेश पाटील यांचेवर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. त्याच्या या तक्रार अर्जामुळे भाजपा आमदार यांचेवर आमदारकी गमवण्याची नामुष्की तसेच कल्याणचे डि.सी.पी विवेक पानसरे यांचेवर पोलिस खात्या अतंर्गत चौकशी होऊन नोकरीवर गदा येण्याची शक्यता, त्याचप्रमाणे भाजपा आमदाराचे खाजगीतील दिपक सपके, सचिन इंगळे, योगेश पाटील यांच्यावर पोलीसी कारवाईची टांगती तलवार या भितीपोटी तर आशिषकुमार चौधरीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला नसावा ना??

३) बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाशी ई-मेल द्वारे झालेला पत्रव्यवहार किंवा विद्यापिठा बरोबर झालेले अँग्रिमेंट हे बनावट आहेत असा विद्यापिठाच्या चौकशीत बाहेर आले. सदरचे ई-मेल व बनावट अँग्रिमेंट याबाबत तत्कालीन कुलगुरु
प्रदिप पाटील यांनी तर हा बनावट व्यवहार केला नसेल ना? कारण प्रदिप पाटील यांच्यावर जळगांव पोलीस स्टेशनला विद्यापिठातील कोट्यावधी रुपयांचा अपहार करून फरार असल्या बाबतचा गुन्हा दाखल झालेला आहे. याची सखोल चौकशी होणे अगत्याचे आहे.यात आशिषकुमार चौधरी यांस गोवले जात नसेल ना??

४) आशिषकुमार चौधरी यांच्या तक्रारी अर्जानुसार भाजपा आमदार गायकवाड यांच्या खाजगी इसमांनी दिपक सपके, सचिन इंगळे, योगेश पाटील यांनी त्याच्याकडून नेलेल्या एक स्विफ्ट कार, एक B.m.w, एक फॉर्च्यूनर हि तीन चार चाकी वाहने तसेच 320 सी.सी.ची थंडरबाईक ही दुचाकी मोटारसायकल त्याचप्रमाणे धमक्या देऊन त्याच्याकडून वारंवार उकळलेल्या साडे चार लाख रोख रक्कम या बाबत पोलीसांनी काय चौकशी केली? तसेच त्याची वाहने हडप केली याबाबत तक्रारी अर्जावर काय कारवाई करण्यात आली? हे सुद्धा बाहेर येणे महत्वाचे आहे.

५) आशिष कुमार चौधरी यांने तक्रारी अर्जात कबूल केले आहे कि, ERP. एज्युकेशनल सॉफ्टवेअरसाठी लागलेला खर्च सुमारे ३५,००,०००/= (पस्तिस लाख) रुपयांची गुंतवणूक आमदारांनी स्वताहून केली आहे आणि हे सॉफ्टवेअर मार्केटिंगसाठी तयार आहे, तसेच ते सॉफ्टवेअर आमदार पुत्र प्रणव गायकवाड यांच्या मायक्रोनेट इंटरप्राईजेस या कंपनीच्या ताब्यात आहे. यावर अशी शंका निर्माण होते कि सॉफ्टवेअर तयार आहे आणि ते कंपनीच्या ताब्यात आहे, तसेच त्या सॉफ्टवेअरसाठी ३५,००,०००/ (पस्तीस लाख) रुपयांची गुंतवणूक झालेली आहे तर ती गुंतवणूक कंपनीची आहे. सॉफ्टवेअरची मार्केटिंग झाली नाही किंवा सॉफ्टवेअर विकले गेले नाही तर याची संपूर्ण जबाबदारी मायक्रोनेट इंटरप्राईजेस या कंपनीची आहे.यात आशिषकुमारने आमदार पुञास लाखो रुपयांना फसविण्याचा प्रश्नच येतो कुठे? अशी ही शंका निर्माण होते.

६) आशिष चौधरी ने कल्याण पूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड, कल्याणचे डि.सी.पी. विवेक पानसरे तसेच दिपक सपके,सचिन इंगळे, आणि योगेश पाटील यांच्या विरुद्ध मा.पोलीस आयुक्त ठाणे यांचेकडे देण्या बरोबरच जवळपास
मा. उच न्यायालय, मुंबई, मा. पोलीस महासंचालक या व्यतिरिक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदि जवळपास १३ ठिकाणी तक्रार अर्ज पाठवले आहेत,जर आशिष कुमार चौधरी यास आमदार पुञ प्रणव गायकवाड यांना फसवायचेच असते तर त्यांने जवळपास १३ ठिकाणी तक्रारी अर्ज दाखल केले नसते. त्याचा तक्रारीत तथ्य असावे आणि त्याची झळ संबधितांना बसु नये म्हणून त्याचेवर खुप उशीराने पण घाईगडबडीत गुन्हा दाखल केला गेला असावा..

७) आशिषकुमार चौधरी याच्या अर्जानुसार गुगलच्या लिस्टवर जगात तिसऱ्या क्रमांकावर होता तसेच इंटरनेट युगात तो टॉपवर होता व आहे. सध्या अंतराळ संशोधनच्या नासा मध्ये कार्यरत आहे. त्याच्या या कार्यप्रणालीचा व हुषारीचा गतकाळात किंवा निवडणूक काळात गैरफायदा करुन घेतला असावा? अथवा भविष्यात काही गैरफायदा करुन घेण्याचा इरादा तर नसावा? अशा अनेक शंकांची उकल होणे आवश्यक आहे.

आशिष चौधरीने केलेल्या तक्रारी अर्जाचा वरिष्ठांमार्फत आणि निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहीजे. आम्हाला येथे आशिष चौधरीच्या किंवा आमदारांच्या बाजूने किंवा विरोधात वक्तव्य करायचे नाही, परंतु संविधानाचा मान ठेऊन दोषी व्यक्तिस कठोर शिक्षा व्हावी या सर्वसामान्य हेतुनेच बातमीचा उद्देश आहे.

आशिष कुमार चौधरी याचेवर आमदार पुत्र प्रणव गायकवाड यांनी केलेला फसवणुकीचा गुन्हा भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना भोवणार का?
आशिषकुमार चौधरी यांनी महिनाभरापूर्वी केलेल्या गौप्यस्फोटामुळे आमदारांची डोकेदुखी वाढणार हे निश्चित, आशिष चौधरी याचेवर दाखल झालेला फसवणुकीचा गुन्हा खोटा ठरतो काय? तसेच भाजपा आमदार गणपत गायकवाड याचवर गुन्हा दाखल होणार काय? हे येणारा काळच ठरवेल…

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.