प्रतिबंधित गुटखा बळगल्याप्रकरणी ३ सराईत गजाआड,अमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी

दापोडी;शासनाने प्रतिबंधित केलेला ३ लाख ७० हजार ७११ रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने शुक्रवारी दि. १६ दुपारी दापोडी येथे करण्यात आली.

अमली पदार्थ विरोधी पथकातील हवालदार प्रदीप छबू शेलार यांनी शुक्रवारी दि. १६ भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मिश्रीलाल समाराम परिहार (वय ४०, रा. जयभीमनगर, दापोडी), गोट्या ऊर्फ शरद अगरवाल (रा. रास्ता पेठ, पुणे), सचिन कलाधर, (रा. वडारवाडी, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परिहार याने शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून आरोपीकडून ३ लाख ७० हजार ७११ रुपयांचा शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा जप्त केला. त्याला हा गुटखा आरोपी अगरवाल आणि कलाधर या दोघांनी दिला होता.

पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.