स्क्रिप्ट वाचा आणि अभिनय करून पोटापाण्याच बघा!किशोर कान्हेरे यांची अमोल कोल्हे वर टीका
पुणे; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर आहेत, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं आहे. यावरून शिवसेना प्रवक्ता किशोर कान्हेरे यांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधलाय.
डॉ. अमोल कोल्हे यांच्या स्मरणशक्तीच्या परीक्षेची वेळ आली बहुतेक, तयार स्क्रिप्ट वाचून बडबड करणारे कलावंत कधी कधी स्मरणशक्ती विसरतात, तसंच अमोल कोल्हे यांचे झाल आहे.आपण ज्या उद्धव साहेबांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलो त्यांनाच ते आज विसरले, असं म्हणत किशोर कान्हेरे यांनी अमोल कोल्हेंच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. अंगापेक्षा पोंगा जास्त झाला की होतं असं, अहो कोल्हे, ज्या उद्धव साहेबांमुळे आपल्याला आणि आपल्या पक्षाला सत्तेची फळे चाखायला मिळाली किमान त्यांना तरी विसरु नका, असा सल्लाही किशोर कान्हेरे यांनी दिला.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दस्तुरखुद्द शरद पवार साहेब सतत उद्धव साहेबांशी सल्ला मसलत करत राज्य कारभार चालवत आहेत. तुम्ही कशाला फार विचार करता, तेवढी तुमची कुवत पण नाही आणि क्षमता पण, दिग्दर्शकाने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचा आणि अभिनय करून पोटापाण्याचे पहा, फार डोके चालवू नका, अशी घणाघाती टीका किशोर कान्हेरे यांनी राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!