किरकोळ वादातून तरुणावर केले कोयत्याने वार,आरोपीविरोधात गुन्हा दाखल

चिखली;मंदिरासमोर फोटो काढताना झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाला कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना पाटीलनगर, चिखली येथील राम मंदिरासमोर घडली.

भीमा अशोक कांबळे (वय २०, रा. चिखलीगाव) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी याबाबत शनिवारी (दि. १७) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास मोरे (रा. चिखलीगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र फोटो काढण्यासाठी पाटीलनगर चिखली येथील राम मंदिरासमोर गेले होते. फोटो काढण्यासाठी फिर्यादी यांचे मित्र जाऊन थांबले असता तेथे आरोपी थांबला होता. त्यांच्यात अचानक भांडण सुरू झाल्याने फिर्यादी ते भांडण सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपी विकास मोरे याने फिर्यादी यांना कोयत्याने मारून जखमी केले.

पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.