लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे;लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करण्यात आला. यातून ही मुलगी गर्भवती राहिली. उत्तम नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय आरोपी आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची ओळख झाली होती. आरोपीने ओळख वाढवून आणि पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फेब्रुवारी २०२० ते जुलै २०२१ या काळात तिच्या सोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यामुळे ही मुलगी गर्भवती राहिली होती. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरोधात उत्तमनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पुढील तपास उत्तम नगर पोलिस करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.