कंपनीच्या गोडाऊन मधुन दिड लाखाचा कच्चामाल चोरीला,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

चाकण;कंपनीच्या गोडाऊनचा मागील बाजूचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी एक लाख ७१ हजार रुपये किमतीचा कच्चामाल चोरून नेला. ही घटना ढवळे वस्ती म्हाळुगे येथे प्रीमियम पोलीअलाईज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या गोडाउन मध्ये घडली.

कारलाल सुरज मलसोनी (वय ३३, रा. ढवळे वस्ती, म्हाळुगे) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढवळे वस्ती म्हाळुगे येथे प्रीमियम पोलीअलाईज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे गोडाऊन आहे. शुक्रवारी दि. १६ रात्री ७ ते शनिवारी दि.१७ सकाळी ९ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचा मागील बाजूचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. गोडाऊन मधून दोन हजार पन्नास किलो वजनाचे प्लास्टिक तीन पी ४० टी एफ ब्लॅकदाना, तीन पी एल ए ९९० ब्लॅकदाना, ३ पी जी एफ ३० ब्लॅकदाना असा १ लाख ७१ हजार ६४० रुपयांचा कच्चामाल चोरून नेला.

पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.