जर्मनीच्या मोनेश क्लासिस एक्सएमआरओ चलनात पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडून,१५ लाखांना गंडा

पुणे;अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आभासी चलन गुंतवणूक करण्यास भाग पाडून तब्बल १५ लाख रुपयांची फसवणूक
करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. “जर्मनीच्या मोनेश क्लासिस एक्सएमआरओ (XMRO) या आभासी चलनात पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडले. २०१७ ते २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत धीरज जगदाळे वय ४७ यांनी तक्रार दिली आहे.आनंद जुन्नरकर, अतुल पाटील, परशुराम पाटील, रघुनाथ बोडखे, अजित शर्मा यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार,फिर्यादी धीरज जगदाळे हे इंजिनियर आहेत. त्याची आणि आनंद जुन्नरकर यांची ओळख झाली होती. जुन्नरकर याने फिर्यादीला बिटकॉइन सारखे जर्मनीचे मोनेश क्लासिस XMRO आभासी चलनात गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळेल असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यासाठी ३ लाख रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तसेच, बिटकॉइन आणि इथोरियम याच्या वॉलेटवरील आभासी चलन (क्रिप्टकरन्सी) असे एकूण १५ लाख रुपये पाठवून त्यांना कोणत्याही प्रकारची रक्कम न देता फसवणूक केली आहे.

सिंहगड रस्ता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.