गांजा विक्रीकरणारे ३ टोळके गजाआड,६ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त

वाघोली;पुणे – अहमदनगर रोडवर वाघोली येथे गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या तीन टोळक्यांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने आज सोमवारी दि.१९ ही कारवाई केली. त्यांच्याकडून ६ लाख ८० हजार किंमतीचा २१ किलो ६६४ ग्रॅम गांजा व इतर साठा जप्त करण्यात आला आहे.

अक्षय अंबादास बिडगर (वय २५, रा.खराडी, पुणे), सोनल किसन काळे (वय १९, रा.जामखेड, अहमदनगर), सागर गोपीनाथ पोले (वय १९,धंदा काहीनाही, रा.कंधार, नांदेड) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत पट्रोलींग करीत होते. त्यावेळी तीनजण एम एच 14 ए व्हि 4958 या चारचाकी गाडीत अवैध गांजा जवळ बाळगला असल्याची गोपीनिय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले व ६ लाख ८० हजार किंमतीचा २१ किलो ६६४ ग्रॅम गांजा व इतर साठा जप्त केला.आरोपी विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात एन.डी.पि. एस. कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण यांनी केली.

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.