पहिली पत्नी असुन केला दुसरा विवाह,पतीसह सासू सासरे अटक
पुणे;पहिली पत्नी असताना ही दुसरी सोबत घरोबा करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दुसऱ्या बायकोने तक्रार दिल्यानंतर पतीसह सासू सासरे आणि नातेवाईक, अशा एकूण सात जणांना अटक केली आहे कोथरूड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी २२ वर्षीय विवाहितेने पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार पती वैभव शंकर तांगुदे (वय ३१), सासू लता शंकर तांगुदे, सासरे शंकर तांगुदे, मुलाचा मामा अरुण मोहकर, मामी वैशाली मोहकर, बहीण वर्षा वैभव मते, वैभव मते आणि पहिली पत्नी सारिका वैभव तांदुगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता त्यांना
जामीन मंजूर करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी महिलेचा पती वैभव तागुंदे याचा यापूर्वी प्रेमविवाह झाला होता. परंतु हा विवाह लपवून त्याने फिर्यादी महिलेसोबत दुसरा विवाह केला होता. त्याच्या या कृत्यात त्याचे आई-वडील आणि इतर कुटुंबीय देखील सहभागी होते. पहिल्या विवाहाची माहिती असतानाही त्यांनी फिर्यादीच्या कुटुंबीयांना न सांगता फसवणूक केली होती.
३० ऑगस्ट २०२० रोजी फिर्यादी महिलेचे आरोपी सोबत लग्न झाले होते. त्यानंतर सासरी नांदत असताना पती सगळ्यांशी लपून कोणाशी तरी फोनवर बोलत असल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यानंतर तिने खोलवर जाऊन चौकशी केली असता त्याचे यापूर्वीच लग्न झाले असल्याची माहिती उघडकीस आली. या सर्व प्रकारानंतर फिर्यादीने तात्काळ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. कोथरुड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींना अटक केली केली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!