वीटभट्टी व्यावसायिकाने दोन तरुणांची लोखंडी रॉड ने मारहाण करून हत्या केल्या प्रकरणी,९ आरोपींना पोलीस कोठडीचे आदेश
चाकण;प्रेमप्रकरणातून वीटभट्टीवर काम करणाऱ्या दोन तरुणांची लोखंडी रॉड गरम करून अंगाला चटके देत व लाकडी दांडक्याने जबर मारहाण करत त्यांची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नऊ हल्लेखोरांना गुरुवार दि. २२ जुलै २०२१ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
तर या घटनेत वडिलांकडून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील करंजविहीरे (ता.खेड, जि.पुणे) येथे शनिवारी (दि. २७ जुलै ) हे दुहेरी हत्याकांड घडले होते.
बाळू सिताराम गावडे ( वय – २६ वर्ष रा. आसखेड खुर्द, ता.खेड, जि. पुणे.) व राहुल दत्तात्रय गावडे ( वय – २८ वर्ष, रा.आसखेड खुर्द) अशी हत्या झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत. चाकण पोलिसांनी करंजविहीरे येथील प्रसिद्ध माणुसकी या हॉटेलचे मालक बाळू उर्फ अप्पा नामदेव मरगज यांच्यासह ललिता बाळू मरगज, प्रसाद बाळू मरगज,अभिषेक बाळू मरगज,आनंदा सीताराम जाधव, चंद्रकला उर्फ मुक्ता बाळू गावडे, राजू साहेबराव गावडे, अनिल संभाजी कडाळे, व किरण बाळू मेंगाळ (सर्वजण रा. करंजविहीरे ता.खेड ) या नऊ जणांना अटक केली होती.अटक केल्यानंतर त्यांना खेडच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याना येत्या २२ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!