राज कुंद्राच्या मढ आयलँडलंड ग्रीन व्हीला वर पोलिसांचा छापा

राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणी सोमवारी रात्री उशिरा अटक केली. आता त्यानंतर पोलिसांनी आज मढ आयलँड या ठिकाणी असलेल्या ग्रीन व्हिला या बंगल्यावर पॉर्न फिल्मचं शुटिंग चालत असे. त्यामुळे या ठिकाणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने धाड टाकली आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा वादांमध्ये अडकल्याचं दिसतं आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार राज कुंद्राला अश्लील फिल्म तयार करणं आणि त्या काही APP वर रिलिज करणं या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. आधी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बराच वेळ राज कुंद्राची चौकशी केली त्यानंतर त्याला अटक केली आहे.

HOTSHOT नावाच्या अॅपवर या पॉर्न फिल्म दाखवल्या जात होत्या. या प्रकरणी मुख्य सहभाग हा राज कुंद्राचा होता असाही आरोप झाला आहे. या प्रकरणी आता मुंबई पोलीस पुढील तपास करत आहेत.

फेब्रुवारीमध्ये मढ परिसरातील एका बंगल्यावर टाकलेल्या छाप्यात अश्लील चित्रपट बनविणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली होती. याच प्रकरणामध्ये कुंद्रा प्रमुख आरोपी असून त्यांच्याविरोधात पुरेसे पुरावे असल्याने अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. राज कुंद्रा यांना सोमवारी रात्री अचानक अटक झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर सोशल नेटवर्किंगवर याचसंदर्भातील चर्चा पहायला मिळाली. अवघ्या काही मिनिटांमध्ये राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी यांचं नाव ट्विटरच्या टॉप ट्रेण्डमध्ये दिसू लागली. विशेष म्हणजे अनेकांनी राज कुंद्रा पुन्हा कायद्याच्या कचाट्यात अडकल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करतानाच यंदा थेट पॉर्नोग्राफी प्रकरणामध्ये राज कुंद्राला अटक झाल्याने सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी अनेक प्रकारचे ट्विट शेअर केले आहेत.

सविस्तर प्रकरण:

फेब्रुवारी २०२१ या महिन्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अश्लील फिल्म तयार करणं आणि त्या काही App वर रिलिज करणं याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणातच राज कुंद्रा याची चौकशी करण्यात आली आणि त्याला अटक करण्यात आली. अश्लील सिनेमांच्या निर्मितीमागे राज कुंद्रा यांचाच हात आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे तसंच त्याच्या विरोधात आमच्याकडे पुरावे आहेत असंही पोलिसांनी म्हटलं आहे. या प्रकरणी आता तपास सुरू आहे.

यापूर्वी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध एका उद्योगपतीने मार्च २०२० मध्ये तक्रार केली होती. मुंबईतील एक नॉन-रेसिडेन्शिअल इंडियन उद्योगपती सचिन जे. जोशी यांनी पोलिसात तक्रारीत केली होती. हे प्रकरण सोन्याचा व्यापार करणारी कंपनी ‘सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड’शी (एसजीपीएल) संबंधित होतं.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.