हरवलेले ७४ मोबाईल फोन शोधण्यात पुणे पोलिसांना यश,गुन्हे शाखा युनिट २ ची उल्लेखनीय कामगिरी

पुणे;हरवलेले महागडे ७४ मोबाईल फोन शोधण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखा युनिट २ च्या वतीने मिसींग मोबाईल शोध घेण्याबाबत विशेष मोहीम राबविण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युनिट दोनने हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यातील मोबाईल मिसींग तक्रारींचा आढावा घेऊन त्यांची माहीती प्राप्त करुन तांत्रिक विश्लेषण केले. तांत्रिक विश्लेषणा दरम्यान मिसींग तक्रारीतील बरेचसे मोबाईल वापरात असल्याचे दिसून आले. त्याबाबत माहीती घेऊन मिसींग मोबाईलचा शोध घेण्यात आला.

यामध्ये एकुण १३ लाख ४३ हजार ७०० रुपये किंमतीचे ७४ महागडे मोबाईल शोध घेण्यात युनिट दोनच्या पथकातील पोलिसांना यश आले आहे. तक्रारदारांशी संपर्क करुन त्यांना मोबाईल परत करण्यात येत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.