अट्टल चोरट्यांनी कुलूप तोडून ९ लाखांना मारला डल्ला,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
निगडी;निगडी प्राधिकरणमधील सिंधूनगर येथे अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून नऊ लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी दि. १८ रात्री दहा वाजता घडली.
मंगला शामकांत वगद (वय ५४, रा. सिंधूनगर, प्राधिकरण निगडी) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर शनिवारी दि. १७ दुपारी तीन ते रविवारी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला.घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ९ लाख १ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!