किरकोळ वादातून दांपत्यास मारहाण,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी;एका दांपत्यास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना गांधीनगर पिंपरी येथील महिंद्रा अॅथिया सोसायटीसमोर घडली.

याबाबत नौशाद जब्बार सय्यद (वय ३८, रा. गांधीनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.रोहन खरात (वय २१), कृष्णा गोवर्धन लोकरे (वय २३, दोघे रा. गांधीनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे १७ जुलै रोजी रात्री अकरा वाजता घराच्या बाहेर थांबले असताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. त्याबद्दल फिर्यादी यांनी आरोपींना जाब विचारला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना धमकी दिली. तसेच त्यांच्या पत्नीला प्लास्टिक बॅरिकेटने मारले. फिर्यादी यांना सिमेंटच्या गट्टने मारत असताना त्यांनी तो चुकवल्याने तो सिमेंटचा गटू त्यांच्या लहान मुलाला लागला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या दुचाकीची
तोडफोड करून नुकसान केले.

पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.