हॉटेल गारवाच्या मालकावर तलवारीने जीवघेणा हल्ला,उपचारादरम्यान मृत्यू,३तीन संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात!

उरळीकांचन;उरळी कांचन येथील गारवा हॉटेल चे मालक होते रविवारी रात्री दहा वाजता त्यांच्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला झाला होता. उरळीकांचन येथील प्रसिद्ध गारवा हॉटेल चे मालक रामदास आखाडे यांच्या वर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आखाडे यांची ५२ तासांची ही मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. बुधवारी रात्री दहाच्या दरम्यान उरुळी कांचन येथील गारवा हॉटेल वर असताना हॉटेल समोर बसलेल्या रामदास आखाडे यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने तलवारीच्या साहाय्याने वार केले. हे वार अत्यंत जोरात असल्याने ते वर्मी लागले होते आणि आखाडे यामध्ये गंभीर जखमी झाले होते.

त्यांना तात्काळ उपचारासाठी लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र रक्तस्राव खूप झाल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर बनली आणि त्यांना उपचारासाठी जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. रामदास आखाडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या तीन संशयितांना पोलिसांनी पकडले आहे. मात्र या हल्ल्याचा सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. व्यावसायिक स्पर्धेतून हा हल्ला झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.