धक्कादायक!चक्क स्फोट करून फोडले एटीएम मशीन
चाकण;चाकण एमआयडीसी परिसरातील भांबोली येथे मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेले एटीएम अज्ञातांनी स्फोट करून फोडले. एटीएम मधून रोख रक्कम चोरून नेली असून नेमकी किती रक्कम चोरीला गेली याबाबत माहिती मिळू शकली नाही. ही घटना आज बुधवारी, दि. २१ मध्यरात्री घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण मधील महाळुगे पोलीस चौकीच्या हद्दीत भांबोली येथे मुख्य रस्त्याच्या बाजूला हिताची कंपनीचे एटीएम आहे. आज मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. एटीएम फोडताना स्फोट झाल्याने मोठा आवाज झाला. त्यामध्ये एटीएमचे मोठे नुकसान झाले.
स्फोट घडवून चोरट्यांनी एटीएम मधून रोकड चोरून नेली. घटनेची माहिती मिळताच महाळुगे पोलीस तसेच गुन्हे शाखा आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत नेमकी किती रक्कम चोरीला गेली याबाबत अजुन नेमकी माहिती मिळू शकली नाही.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!