प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारा सराईत गजाआड,३९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, तळेगाव-दाभाडे पोलिसांची कामगिरी

तळेगांव;प्रतिबंधित गुटखा वाहतूक केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी गुटखा, तंबाखू आणि दोन बोलेरो पिकप असा एकूण ३९ लाख ५९ हजार ५५६ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.ही कारवाई सोमवारी दि. १९ रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली.

पोलीस नाईक आकाश भालेराव यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बोलेरो पिकप (एम एच 12 / एस एक्स 2896) चालक आणि कामगार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तंबाखूची वाहतूक सुरू असून तळेगाव दाभाडे येथे वर्णा हॉटेल जवळील एका घराशेजारी मोकळ्या जागी बोलेरो पिकप मधून या गुटख्याची वाहतूक होत आहे. अशी माहिती तळेगाव-दाभाडे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत विमल पान मसाला, तंबाखू आणि दोन बोलेरो पिकप असा एकूण ३९ लाख ५९ हजार ५५६ रुपयांचा ऐवज जप्त केला.

पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.