वैयक्तिक,आर्थिक अडचणी सांगून पैशांची मागणी करत ७ लाखांना घातला गंडा, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
चिखली;व्यावसायिकाचा विश्वास संपादन करून त्याच्याकडून ७ लाख ७० हजार रुपये घेतले. घेतलेली रक्कम परत न करता व्यावसायिकाची फसवणूक केली. ही घटना पाच जुलै २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधीत शेलारवस्ती, चिखली येथे घडली.
याबाबत चंद्रकांत जनार्दन कुंभार (वय ४२, रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २०) फिर्याद दिली आहे.लक्ष्मीकांत गिरमलअप्पा सिंत्री (रा. आळंदी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा शेलारवस्ती चिखली येथे अॅल्युमिनियम कास्टिंग बनवण्याचा कारखाना आहे. त्यांना व्यवसायावर कर्ज काढायचे असल्याने त्यांनी आरोपीला बँकेकडे कर्ज प्रकरण करण्यास सांगितले. दरम्यान फिर्यादी आणि आरोपी यांची ओळख झाली. आरोपीने वेळोवेळी फिर्यादी यांच्याकडे वैयक्तिक व आर्थिक अडचणी सांगून पैशांची मागणी केली होती. फिर्यादी यांनी आरोपी याच्यावर विश्वास ठेवून बँक खात्यातून ६ लाख ७० हजार रुपये आरोपीच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले. त्यानंतर १ लाख रुपये रोख रक्कम दिली. आरोपीने फिर्यादी यांच्या कडून घेतलेले ७ लाख ७० हजार रुपये फिर्यादी यांनी परत मागितले असता आरोपीने ७ लाख रुपयांचा एक धनादेश फिर्यादी यांना दिला. फिर्यादी यांनी तो धनादेश दोन वेळा बँकेमध्ये जमा केला. मात्र आरोपीच्या खात्यामध्ये रक्कम शिल्लक नसल्याने धनादेश वटला नाही. याबाबत फिर्यादी यांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.
पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!