बलात्काराच्या गुन्ह्यातील १ वर्षापासून फरार आरोपी जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखे ची उल्लेखनीय कामगिरी

शिरूर;१ वर्षा पासून बलात्कार सारख्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्यावशितफिने अटक केले आहे.सदरची कारवाई नाव्हरा परिसरात करण्यात आली आहे.सदर आरोपी विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु र नं 51/2018 भा द वी 392,307,323, 504,506, 34 असे यापूर्वीचे गुन्हा दाखल आहेत.

अभिजित जयसिंग उर्फ बाळासाहेब शितोळे (वय २४ रा गणेगाव दुमला ता शिरूर जिल्हा पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फरारी आरोपीचा शोध घेऊन त्यांच्या वर कारवाई ककरण्याच्या आदेशा नुसार तपास करत असताना, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरूर पोलिस स्टेशन परिसरात गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहिती वरून नाव्हरा येथे सापळा रचून शिरूर पोलिस स्टेशन गु र नं 393/19 भा द वी 376 (इ)376 (ड)324, 323, 452504,506,32 34 सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारणा 2015 चे कलम 3(1)WI 3(2)(V)V3 (1)(r)sका सह अ. जा. ज.अ. प्र 1989 चे कलम 6 या सह आर्म ऍक्ट 3.25 या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक केले. आरोपीस वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी शिरूर पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई मा पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते दौड उपविभागीय अधिकारी राहुल धस स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पो हवा अनिल काळे, पो हवा रविराज कोकरे, पो हवा राजू मोमीन, पो ना विजय कांचन, पो कॉ अमोल शेडगे, पो कॉ मंगेश भगत, पो कॉ धिरज जाधव, पो कॉ अक्षय नवले , म पो कॉ पूनम गुंड यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.