निगडीतील इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे तीन मजली इमारतीला आग,सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही

निगडी;साईनाथनगर निगडी येथे इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे तीन मजली इमारतीला आग लागली. ही घटना आज (गुरुवारी दि. २२) पहाटे दीड वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

साईनाथनगर निगडी येथे नगरसेवक सचिन चिखले यांच्या कार्यालयाजवळ गावंडरे याची तीन मजली इमारत आहे. या संपूर्ण इमारतीमध्ये भाडेकरू राहतात. गुरुवारी पहाटे दीड वाजताच्या सुमारास इमारतीच्या खालील भागात इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीचा प्रचंड धूर इमारतीत पसरला. सर्व खोल्यांमध्ये धूर पसरल्याने भाडेकरू तरुण बाहेर आले. सुमारे ५० ते ६० भाडेकरू तरुणांनी मिळेल त्या दिशेने उड्या मारून आपला जीव वाचवला. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली असता त्यानंतर अडीच वाजताच्या सुमारास एक बंब घटनास्थळी दाखल झाला. काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र शॉर्टसर्किटने आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.