कमी दर्जाचे मोबाईल किट देऊन व्यावसायिकाची ५ लाखाची फसवणूक, २सरराईतांवर गुन्हा दाखल

तळेगांव;कमी दर्जाचे मोबाईल किट देऊन ते कीट बोगस असल्याने परत घेऊन पैसे देण्याचे आश्वासन देऊन एका व्यावसायिकाची ५ लाख २७ हजारांची फसवणूक केली. ही घटना सोमाटणे फाटा येथे घडली.

याबाबत अजय सुरेश अरगडे (वय ३९, रा. सोमाटणे, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.अमित रॉय, संतोष पाठक (दोघे रा. मीरा रोड ईस्ट, ठाणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना कमी दर्जाचे मोबाईल किट दिले. ते किट बोगस स्वरूपाचे असल्याने सदर किट परत करून पैसे परत देतो असे आश्वासन आरोपींनी फिर्यादी यांना दिले. आश्वासन देऊन देखील आरोपीने फिर्यादी यांना पैसे परत दिले नाही. तसेच पैसे मागण्यास आल्यास तुमचे हात पाय तोडेल, अशी धमकी दिली.यामध्ये आरोपींनी फिर्यादी यांची ५ लाख २७ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली.

पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.