पीएमपीएमएल चालकाच्या खुनातील आरोपींना २४ तासात जेरबंद केल्याबद्दल,गुन्हे शाखा युनिट ६ चा जाहीर सत्कार

पुणे; काही दिवसांपूर्वी पीएमपीएमएल मधील स्वारगेट डेपोतील बदली चालक स्व. गौतम साळुंखे याची भेकराई नगर येथे निर्घृण हत्या करण्यात आली होती.हत्त्या करणाऱ्या आरोपीना काही तासातच गुन्हे शाखा युनिट ६ पुणे शहर जेरबंद केले.आणि पीएमपीएमएल कामगाराला न्याय मिळून दिला.

या कामगिरी बद्दल गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. गणेश माने साहेब, नरेंद्र पाटील साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच स्वारगेट डेपोतील शिबिरास उपस्थित कामगारांना स्यॅनिटायझर, मास्क आणि ORS चे किट वाटप करण्यात आले.

मा.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त PMPML मधील कामगारांसाठी स्वारगेट डेपोत दिनांक २२ ते २४ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत पूर्ण बॉडी चेकअप डॉ. कदम डायगनोस्टिक सेंटर, पुणे म.न.पा यांच्या वतीने शिबिराचे आयोजन मा. अश्विनी नितीन कदम नगरसेवक, माजी स्थायी समिती अध्यक्षा, पुणे म.न.पा आणि PMPML राष्ट्रवादी कामगार युनियन यांनी संयुक्त केले आहे.

या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित मा. अश्विनीताई नितीनदादा कदम नगरसेविका, माजी अध्यक्षा स्थायी समिती पुणे म.न.पा, राष्ट्रवादी युनियन अध्यक्ष मा. किरणशेठ थेऊरकर, कामगार व जनता संपर्क अधिकारी मा. सतीश गाटे साहेब, डेपो मॅनेजर मा. राजेश कुदळे, राष्ट्रवादी कामगार सेल अध्यक्ष मा. राजेंद्र कोंडे, OBC सेल हडपसर विधानसभा अध्यक्ष मा. तुकाराम शिंदे, युनियनचे सरचिटणीस मा. सुनिलभाऊ नलावडे, उपाध्यक्ष हरिश ओहळ, PMC अर्बन बँक संचालक मा. सुनिल कांबळे आणि शेखरभाऊ सावंत, दत्तभक्त मा. भाऊ चव्हाण, स्वारगेट डेपो अध्यक्ष मा. विवेक कदम, ATK बाणकर, ATK गावडे, ATK धापटे, लिटके साहेब, ऑफिस स्टाफ घोणे, जगताप, तापकीर, दारवटकर, वाघमारे, जळगावकर, उल्हास पानसरे, गणेश निली, विलास नल्ला, चंद्रकांत माने, संतोष आडेप, नवले, आण्णा क्षीरसागर, गणेश कदम बाळासाहेब पायगुडे, प्रवीण चिकणे, शिवा निवगुणे, विशाल कदम, नंदू पाटील, आनंद जगताप, प्रशांत मरळ, सागर शेजवळ, ज्ञानेश्वर जावळेकर, भाऊसाहेब दळवी, अमित चोरघे, समीर शहाडे, सुनिल रोकडे, हेमंत अहिरराव आणि वर्कशॉप विभागातील आणि चालक व वाहक तसेच स्वच्छता विभागातील सेवक उपस्थित होते. श्री. हरिश ओहळ यांनी मान्यवरांचे आभार मानले.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.