चक्क ११ लाखांच्या सिगारेट चोरल्या, सरराई चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल
हिंजवडी;गोडाऊनचे शटर मोडून चोरट्यांनी ११ लाख ६९ हजार ४१ रुपये किमतीच्या सिगारेट चोरून नेल्या. ही घटना मंगळवारी (दि. २०) मध्यरात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास सरकार चौक मारूंजी येथे घडली.
रोशन रमेश वाधवाणी (वय ४०, रा. पिंपरी) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार चौक, मारुंजी येथे बॉम्बे एजन्सीचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये फिर्यादी रोशन वाधवाणी मॅनेजर म्हणून काम करतात. २० जुलै रोजी मध्यरात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी बॉम्बे एजन्सीच्या गोडाऊनचे शटर उघडुन आत प्रवेश केला. गोडावूनमधून ११ लाख ६९ हजार ४१ रुपये किमतीचा विविध कंपनीचा सिगारेटचा माल चोरट्यांनी चोरून नेला.
पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!