पुणे नक्की कधी सुरू होणार?
पुणे;कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी पुणे जिल्ह्या प्रशासनाने तयारी केली आहे. पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी रेट ३.९ वर आला आहे. पुण्यातील हॉटेल, दुकानांची वेळ ५ ऐवजी ७ पर्यंत करा, अशा सूचना आलेल्या आहेत. याबाबतचा सकारात्मक निर्णय सोमवारी होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
कोरोना प्रतिबंधत लसीचे Corona Vaccine दोन्ही डोस झालेल्यांना बाहेर पडता येईल का ? याबाबतीत विचार सुरु असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
राज्यात सध्या विविध ठिकाणी पाऊस सुरू असून दगडी कोसळल्याच्या घटना घडत आहेत. कोकण, कोल्हापूर, पुणे जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसला आहे. राज्यातील ९० हजार नागरिकांचे सुरक्षीत स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. एनडीआरएफचे २१ पथक सध्या काम करीत आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!