ऑगस्ट मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट सव्वा दोन लाख रुपये

कोरोना काळाच्या लाखो शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी समोर आलीय. बनास डेअरीने आपल्या शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा बोनस जाहीर केलाय. बनास डेअरीशी संबंधित प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर लाखो रुपये पाठविले जाणार आहेत. बनासकांठा जिल्हा सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष (शंकरभाई चौधरी) यांनी ५ लाखांहून अधिक पशुपालक शेतकऱ्यांना ११२८ कोटी रुपयांचा बोनस जाहीर केलाय.

ऑगस्ट महिन्यात पैसे खात्यात येणार:

हा बोनस पुढच्या महिन्यात ऑगस्टमध्ये खात्यात वर्ग केले जाणार आहे. देशातील कोणत्याही सहकारी दुग्धशाळेने जाहीर केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा बोनस आहे.

बोनसची रक्कम प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात सुमारे २२५,६००  रुपये पाठविली जाईल.

१२५ कोटी रुपयांचे डिबेंचर्सची रक्कम मिळणार

बनास डेअरी दूध संस्थांना १२५ कोटी रुपयांचे डिबेंचर देण्यात येईल. उत्तर गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील ५.६ लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना १००७ कोटी रुपयांचे थेट पैसे दिले जातील. २०१९-२० या आर्थिक वर्षात बनास डेअरीने ११४४ कोटींचा बोनस दिला होता.

बनास डेअरीचा १३००० कोटींचा महसूल

२०२०-२१ या आर्थिक वर्षात बनास डेअरीचा महसूल ११ टक्क्यांनी वाढून सुमारे १३००० कोटी रुपये झालाय. खाद्यतेल, मध यासारख्या दुग्धजन्य व्यवसायांनी या वाढीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दुग्धशाळेने सांगितले की, आम्ही खर्चासाठी सोयीचे उपाय अवलंबिले आहेत आणि खर्च कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. बनास डेअरी दूध उत्पादकांना एकूण उत्पन्नाच्या ८२.२८ टक्के फायदा देते.

तब्बल ४२ लाख अपात्र लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ, वसुलीची प्रक्रिया सुरु

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी पीएम किसान योजनेचा ४२ लाख अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याची माहिती दिली आहे. पीएम किसान योजना सुरु झाल्यापासून जवळपास २९०० कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचं तोमर म्हणाले. मात्र, अपात्र शेतकऱ्यांकडून संबंधित रक्कम परत घेतली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. नरेंद्रसिंह तोमर यांनी संसदेत अतारांकित प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात ही बाब समोर आली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.