चौकशीदरम्यान चक्क पोलिसांना शिवीगाळ,६ टोळक्यांन विरुद्ध गुन्हा दाखल

आकुर्डी;तक्रार अर्जाची चौकशी सुरू असताना ६ टोळक्यांनी मिळून पोलीस चौकीत पोलसांना शिवीगाळ आणि मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून ४ जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना आकुर्डी पोलीस चौकी येथे घडली.

याबाबत पोलीस नाईक सचिन बेबले यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.विश्वास बाबुराव निकम (वय ६४), विजय निकम (वय ६०), शोभा निकम (वय ५०), सागर विश्वास निकम (वय ३५), सरला सपकाळे (वय ४५), मिलिंद रणदिवे (वय ५५, सर्व रा. निगडी प्राधिकरण) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. विश्वास निकम आणि सागर निकम या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री आकुर्डी पोलीस चौकी येथे एका तक्रार अर्जाची चौकशी सुरू असताना. त्यावेळी आरोपींनी बेकायदेशीरपणे जमाव जमून साथरोग नियंत्रण अधिनियमाची पायमल्ली करून पोलिसांना शिवीगाळ व मारहाण केली. तसेच धमकी देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याबाबत सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पुढील तपास निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.